२२ तुम्ही आपल्या शेतांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या काठावरचं सगळं पीक कापू नका आणि कापणी करताना जे उरेल, ते उचलू नका.+ तुम्ही ते गरिबांसाठी*+ आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्या विदेश्यासाठी+ तसंच राहू द्या. मी तुमचा देव यहोवा आहे.’”
१९ तुम्ही आपल्या शेतातल्या पिकांची कापणी करता, तेव्हा शेतात विसरलेली पेंढी आणायला परत जाऊ नका. तुमच्यात राहणारे विदेशी, अनाथ मुलं आणि विधवा यांच्यासाठी ती राहू द्या;+ म्हणजे तुमचा देव यहोवा तुमच्या सगळ्या कामांमध्ये तुम्हाला आशीर्वाद देईल.+