-
१ इतिहास २०:२, ३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ मग दावीदने मल्कामच्या* डोक्यावरचा मुकुट काढून घेतला. मुकुटातल्या सोन्याचं वजन एक तालान्त* इतकं होतं. याशिवाय, त्यात मौल्यवान रत्नंही जडलेली होती. तो मुकुट दावीदच्या डोक्यावर ठेवण्यात आला. दावीदने त्या शहरातून अतिशय मोठ्या प्रमाणात लुटीचा मालही आणला.+ ३ त्याने त्या शहरातल्या लोकांना बाहेर काढलं आणि त्यांना करवतीने दगड कापण्याच्या कामाला लावलं.+ तसंच, त्याने त्यांना धारदार लोखंडी हत्यारं व कुऱ्हाडी वापरून मजुरीची कामं करायला लावली. दावीदने अम्मोनी लोकांच्या सर्व शहरांच्या बाबतीत असंच केलं. शेवटी, दावीद आणि त्याचे सर्व सैनिक यरुशलेमला परत आले.
-