-
उत्पत्ती ३२:१, २पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३२ मग याकोब पुढच्या प्रवासाला निघाला आणि वाटेत त्याला देवाचे दूत भेटले. २ त्यांना पाहताच याकोब म्हणाला: “ही देवाच्या सैन्याची छावणी आहे!” म्हणून त्याने त्या जागेचं नाव महनाइम* ठेवलं.
-
-
यहोशवा १३:२९, ३०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२९ मोशेने मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या घराण्यांनाही त्यांच्या हिश्शाप्रमाणे प्रदेश वारसा म्हणून वाटून दिला.+ ३० त्यांना वारशात मिळालेला प्रदेश म्हणजे: महनाइमपासून+ संपूर्ण बाशानपर्यंतचा प्रदेश, म्हणजेच बाशानचा राजा ओग याच्या संपूर्ण राज्यापर्यंत पसरलेला प्रदेश; आणि बाशानमध्ये असलेली याईरची+ सगळी खेडी* आणि ६० नगरं.
-