वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ७:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ तुम्हाला चांगलं माहीत आहे, की तुमचा देव यहोवा हाच खरा देव आहे आणि तो विश्‍वासू देव आहे; जे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांशी तो आपला करार पाळतो आणि त्यांना एकनिष्ठ प्रेम दाखवतो.+

  • २ इतिहास ६:१४-१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ आणि तो म्हणाला: “हे इस्राएलच्या देवा यहोवा! स्वर्गात आणि पृथ्वीवर तुझ्यासारखा कोणीही देव नाही; तू आपला करार पाळतोस आणि तुझ्या मार्गांवर पूर्ण मनाने चालणाऱ्‍या आपल्या सेवकांवर एकनिष्ठ प्रेम करतोस.+ १५ तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं वचन पूर्ण केलंस.+ तू स्वतः आपल्या मुखाने वचन दिलं होतं आणि आज तू स्वतःच्या हाताने ते पूर्ण केलंस.+ १६ आता हे इस्राएलच्या देवा यहोवा तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं हे वचन पूर्ण कर. तू म्हणाला होतास: ‘तुझ्या मुलांनी जर आपल्या वागणुकीकडे लक्ष दिलं आणि ते तुझ्यासारखंच माझ्या नियमांनुसार माझ्यासमोर चालत राहिले,+ तर इस्राएलच्या राजासनावर बसायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+ १७ तर आता हे इस्राएलच्या देवा यहोवा! तू तुझ्या सेवकाला, दावीदला दिलेलं हे वचन खरं ठरो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा