वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया ५२:६-११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ मग चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी,+ शहरातला दुष्काळ भयंकर वाढला होता आणि लोकांकडे खायला काहीही उरलं नव्हतं.+ ७ शेवटी, शहराच्या भिंतीचा काही भाग पाडण्यात आला. आणि खास्दी लोकांनी शहराला वेढा घातलेला असताना, शहरातले सर्व सैनिक राजाच्या बागेजवळ असलेल्या दोन भिंतींच्या मधल्या दरवाजातून रातोरात पळून गेले. ते अराबाकडे जाणाऱ्‍या रस्त्याने पळाले.+ ८ पण खास्दी लोकांच्या सैन्याने सिद्‌कीया राजाचा पाठलाग केला आणि यरीहोच्या ओसाड रानात त्याला गाठलं.+ तेव्हा राजाचे सर्व सैनिक त्याला सोडून इकडे-तिकडे पळून गेले. ९ मग त्यांनी राजाला कैद करून हमाथ देशातल्या रिब्ला इथे बाबेलच्या राजाकडे आणलं; तिथे त्याने त्याला शिक्षा सुनावली. १० मग बाबेलच्या राजाने रिब्लामध्ये सिद्‌कीयासमोर त्याच्या मुलांना मारून टाकलं. तसंच, त्याने यहूदाच्या सगळ्या अधिकाऱ्‍यांचीही तिथे कत्तल केली. ११ नंतर बाबेलच्या राजाने सिद्‌कीयाचे डोळे फोडले+ आणि त्याला तांब्याच्या बेड्या घालून बाबेलला आणलं. तिथे सिद्‌कीया मरेपर्यंत कैदेतच राहिला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा