वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ९:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ६ आमच्यासाठी एक बाळ जन्माला आलं आहे,+

      आम्हाला एक मुलगा देण्यात आला आहे;

      त्याच्या खांद्यावर सत्ता* राहील.+

      त्याला अद्‌भुत सल्लागार,+ शक्‍तिशाली देव,+ सर्वकाळचा पिता आणि शांतीचा राजकुमार म्हटलं जाईल.

  • यहेज्केल २१:२६, २७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘आपल्या डोक्यावरची पगडी काढ आणि आपला मुकुट काढून टाक.+ आधीसारखं काहीच राहणार नाही.+ जो खाली आहे त्याला वर उचललं जाईल+ आणि जो वर आहे त्याला खाली आणलं जाईल.+ २७ मी नाश करीन! हो, मी त्याचा नाश करीन! नाश केल्याशिवाय मी राहणार नाही! तो मुकुट कोणालाही मिळणार नाही. पण ज्याला तो मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे, तो येईल+ तेव्हा मी त्याला तो देईन.’+

  • दानीएल ४:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ पहारेकऱ्‍यांनी+ जाहीर केलेला आदेश आणि पवित्र दूतांनी घोषित केलेला निर्णय हाच आहे. यावरून पृथ्वीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांना समजेल, की सर्वोच्च देव हाच मानवी राज्यांवर शासनकर्ता आहे.+ तसंच, आपली इच्छा असेल त्याला तो राज्य देतो आणि अगदी क्षुल्लक व साधारण माणसालाही त्यावर शासन करायला नेमतो.”

  • आमोस ९:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ ‘त्या दिवशी मी दावीदचा पडलेला तंबू* पुन्हा उभा करीन,+

      मी खिंडारं दुरुस्त करीन,

      त्याचे कोसळलेले भाग परत उभे करीन;

      मी तो पूर्वीच्या दिवसांप्रमाणे पुन्हा बांधीन.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा