८ यहोवा म्हणतो, ‘ज्या दिवशी मी लूट घेण्यासाठी उठीन,
त्या दिवसापर्यंत माझी धीराने वाट पाहत राहा;+
कारण मी राष्ट्रांना गोळा करण्याचा, राज्यांना एकत्र आणण्याचा,
आणि त्यांच्यावर माझा संताप, माझा सगळा क्रोध ओतण्याचा निर्णय घेतला आहे;+
कारण माझ्या आवेशाच्या आगीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल.+