-
यशया ५९:९, १०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ म्हणूनच न्याय आमच्यापासून फार लांब आहे,
आणि नीतिमत्त्व आमच्यापर्यंत पोहोचत नाही.
आम्ही उजेडाची आशा धरतो, पण पाहा! आमच्या वाट्याला अंधारच येतो.
आम्ही प्रकाशाची आशा धरतो, पण पाहा! आम्ही काळोखातच चालत राहतो.+
१० आंधळ्या माणसांसारखं आम्ही भिंत चाचपडत चालतो,
डोळे नसणाऱ्यांसारखं आम्ही इथे-तिथे चाचपडत राहतो.+
भरदुपारी आम्ही संध्याकाळच्या अंधारात चालल्यासारखं धडपडतो.
आम्ही शक्तिशाली माणसांमध्ये मेलेल्या माणसांसारखे आहोत.
-
-
आमोस ८:९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘त्या दिवशी,
मी भर दुपारी सूर्य मावळायला लावीन,
लख्ख प्रकाशाच्या दिवशी काळोख पसरवीन.+
-