-
यहोशवा २३:६, ७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ आता हिंमत धरा आणि मोशेच्या नियमशास्त्रात+ जे काही लिहिलंय त्याचं काळजीपूर्वक पालन करा; त्यापासून कधीही भरकटू नका.+ ७ तुमच्यामध्ये राहत असलेल्या इतर राष्ट्रांच्या लोकांमध्ये मिसळू नका.+ त्यांच्या देवांच्या नावांचा उल्लेखसुद्धा करू नका+ किंवा त्यांच्या नावाने शपथ घेऊ नका. त्यांची कधी उपासना करू नका किंवा त्यांच्या पाया पडू नका.+
-
-
१ राजे ११:३३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३३ मी असं करीन कारण त्यांनी मला सोडून दिलंय.+ आणि ते सीदोनी लोकांची देवी अष्टारोथ, मवाबी लोकांचं दैवत कमोश आणि अम्मोनी लोकांचं दैवत मिलकोम यांच्या पाया पडत आहेत. शलमोनचे वडील दावीद यांच्याप्रमाणे ते माझ्या मार्गांनुसार चालले नाहीत. त्यांनी माझ्या दृष्टीने जे योग्य ते केलं नाही आणि माझ्या कायद्यांचं व नियमांचंही पालन केलं नाही.
-