७ तुम्ही ओसाड रानात आपला देव यहोवा याला कशी चीड आणली, हे कधीही विसरू नका.+ ज्या दिवशी तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला, त्या दिवसापासून या ठिकाणी येईपर्यंत तुम्ही यहोवाविरुद्ध बंड करत आला आहात.+
५१ हृदय आणि कानांची सुंता न झालेल्या अडेल वृत्तीच्या माणसांनो, तुम्ही नेहमीच पवित्र शक्तीचा* प्रतिकार करत आला आहात. तुमच्या पूर्वजांनी जसं केलं तसंच तुम्हीही करता.+