-
लूक ६:४७-४९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४७ जो माझ्याकडे येतो आणि माझी वचनं ऐकून त्यांप्रमाणे वागतो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला सांगतो:+ ४८ तो अशा एका माणसासारखा आहे, ज्याने घर बांधताना खोलपर्यंत खोदून खडकावर पाया घातला. मग पूर आला तेव्हा नदीचं पाणी घरावर आदळलं, पण ते त्या घराला हलवू शकलं नाही. कारण ते घर मजबूत बांधलेलं होतं.+ ४९ याउलट जो ऐकतो, पण त्याप्रमाणे करत नाही+ तो अशा एका माणसासारखा आहे ज्याने पाया न घालताच घर बांधलं. मग नदीचं पाणी त्यावर आदळलं आणि ते घर लगेच कोसळलं आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.”
-