-
मार्क ६:१-६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ तिथून निघाल्यावर तो आपल्या गावी आला+ आणि त्याचे शिष्यही त्याच्यामागे आले. २ मग शब्बाथाच्या दिवशी तो सभास्थानात जाऊन शिकवू लागला. तेव्हा ऐकणाऱ्या बऱ्याच जणांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “हा माणूस या सगळ्या गोष्टी कुठून शिकला?+ ही बुद्धी आणि चमत्कार* करायची शक्ती याला कोणी दिली?+ ३ हाच तो सुतारकाम करणारा+ मरीयाचा मुलगा+ आहे ना? हा याकोब,+ योसेफ, यहूदा आणि शिमोन यांचाच भाऊ आहे ना?+ याच्या बहिणीही इथेच राहत नाहीत का?” म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. ४ पण येशू त्यांना म्हणाला: “संदेष्ट्याचा सगळीकडे आदर केला जातो, फक्त त्याच्या स्वतःच्या गावात, नातेवाइकांत आणि स्वतःच्या घरात केला जात नाही.”+ ५ म्हणून, त्याने तिथे फक्त काही आजारी लोकांवर हात ठेवून त्यांना बरं केलं. याशिवाय इतर कोणतेही चमत्कार* तो त्या ठिकाणी करू शकला नाही. ६ खरंतर, त्यांचा अविश्वास पाहून त्याला आश्चर्य वाटलं. मग तो आसपासच्या गावांत फिरून तिथे शिकवू लागला.+
-