वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क ८:१-९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ त्या दिवसांत, पुन्हा लोकांचा एक मोठा समुदाय जमला होता आणि त्यांच्याजवळ खायला काहीच नव्हतं. म्हणून येशू आपल्या शिष्यांना बोलावून म्हणाला: २ “मला या लोकांची दया येते+ कारण ते तीन दिवसांपासून माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नाही.+ ३ मी जर त्यांना असंच उपाशी घरी पाठवून दिलं, तर वाटेत त्यांचे भुकेने हाल होतील. काही जण तर फार दुरून आले आहेत.” ४ पण त्याचे शिष्य त्याला म्हणाले: “लोक पोटभर जेवू शकतील इतक्या भाकरी या एकांत ठिकाणी कुठून आणाव्यात?” ५ तेव्हा त्याने त्यांना विचारलं: “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले: “सात.”+ ६ मग लोकांना खाली बसायला सांगून येशूने त्या सात भाकरी घेतल्या आणि देवाला धन्यवाद देऊन त्या मोडल्या. त्याने त्या शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी त्या लोकांना वाढल्या.+ ७ त्यांच्याजवळ काही लहान मासेही होते. तेव्हा धन्यवाद देऊन त्याने शिष्यांना तेही वाढायला सांगितले. ८ मग लोक पोटभर जेवले आणि जेव्हा त्यांनी उरलेलं अन्‍न गोळा केलं, तेव्हा सात मोठ्या टोपल्या भरल्या.+ ९ त्या वेळी, जेवणाऱ्‍या पुरुषांची संख्या जवळजवळ ४,००० होती. मग येशूने त्यांना निरोप दिला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा