-
मार्क ९:३३-३७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३३ मग ते कफर्णहूम इथे आले आणि घरात गेल्यानंतर त्याने त्यांना विचारलं: “रस्त्यात तुम्ही कशाबद्दल वाद घालत होता?”+ ३४ पण ते शांतच राहिले, कारण आपल्यापैकी श्रेष्ठ कोण आहे याबद्दल ते वाद घालत होते. ३५ तेव्हा खाली बसून त्याने १२ शिष्यांना जवळ बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “ज्याला तुमच्यामध्ये पहिला व्हायचं असेल, त्याने सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यांचा सेवक झालं पाहिजे.”+ ३६ मग त्याने एका लहान मुलाला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला त्यांच्यामध्ये उभं केलं. त्याच्या खांद्यांवर हात ठेवून तो त्यांना म्हणाला: ३७ “जो अशा एखाद्या लहान मुलाला+ माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो, तो फक्त मलाच नाही, तर ज्याने मला पाठवलं त्यालाही स्वीकारतो.”+
-
-
लूक ९:४६-४८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४६ मग आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरून शिष्यांमध्ये वाद सुरू झाला.+ ४७ तेव्हा त्यांच्या मनातले विचार ओळखून, येशूने एका लहान मुलाला आपल्याशेजारी उभं केलं. ४८ मग तो त्यांना म्हणाला: “जो या लहान मुलाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो. आणि जो मला स्वीकारतो, तो ज्याने मला पाठवलं त्यालाही स्वीकारतो.+ कारण तुम्हा सगळ्यांमध्ये जो स्वतःला इतरांपेक्षा लहान समजून वागतो तोच श्रेष्ठ आहे.”+
-