३४ यरुशलेम, यरुशलेम, संदेष्ट्यांची हत्या करणारी आणि तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारी नगरी!+ कोंबडी जशी आपल्या पिल्लांना आपल्या पंखांखाली एकत्र करते, तसंच तुमच्या मुलांना एकत्र करण्याची माझी कितीतरी वेळा इच्छा होती! पण तुम्हाला ते नको होतं.+
४१ मग शहराजवळ आल्यावर त्याने त्यावर नजर टाकली आणि तो रडू लागला.+४२ तो म्हणाला: “तू, हो तू जर आज शांतीच्या गोष्टी समजून घेतल्या असत्या, तर किती बरं झालं असतं! पण आता त्या तुझ्यापासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.+