४पण, प्रेरित वचन स्पष्टपणे सांगतं की भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा काही जण दिशाभूल करणाऱ्या प्रेरित संदेशांकडे+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या* शिकवणींकडे लक्ष देऊन विश्वास सोडून देतील.
२पण ज्याप्रमाणे देवाच्या लोकांमध्ये खोटे संदेष्टे उठले होते, त्याचप्रमाणे तुमच्यामध्येही खोटे शिक्षक असतील.+ ते चोरून-लपून विनाशकारी पंथ निर्माण करतील आणि ज्याने त्यांना विकत घेतलं त्या आपल्या मालकालाही ते नाकारतील.+ अशा रितीने ते एकाएकी स्वतःवर विनाश ओढवून घेतील.