-
मार्क १४:५५-५९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५५ आता मुख्य याजक आणि संपूर्ण न्यायसभा,* येशूला मृत्युदंड देता यावा म्हणून त्याच्याविरुद्ध पुरावा शोधत होती. पण त्यांना तो सापडत नव्हता.+ ५६ खरंतर, बरेच जण त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देत होते.+ पण त्यांच्या साक्षीत मेळ बसत नव्हता. ५७ तसंच, काही जण उभे राहून त्याच्याविरुद्ध अशी खोटी साक्ष देत होते: ५८ “आम्ही याला असं म्हणताना ऐकलं, की ‘हातांनी बांधलेलं हे मंदिर मी पाडीन आणि तीन दिवसांत असं एक मंदिर उभं करीन, जे हातांनी बांधलेलं नाही.’”+ ५९ पण या बाबतीतही त्यांच्या साक्षीत मेळ बसत नव्हता.
-