-
मत्तय ८:२४-२७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ अचानक, समुद्रात मोठं वादळ आलं आणि लाटा नावेवर आदळू लागल्या; पण तो झोपला होता.+ २५ तेव्हा, त्याच्याकडे येऊन त्यांनी त्याला उठवलं आणि म्हटलं: “प्रभू, वाचव, आपण बुडतोय!” २६ पण, तो त्यांना म्हणाला: “इतकं का घाबरता?* किती कमी विश्वास आहे तुमच्यात!”+ मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला आणि समुद्राला दटावलं. तेव्हा समुद्र अगदी शांत झाला.+ २७ हे पाहून शिष्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “हा माणूस आहे तरी कोण? वारा आणि समुद्रही याचं ऐकतात.”
-
-
लूक ८:२३-२५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२३ पण नावेतून जात असताना त्याला झोप लागली. मग एक जोरदार वादळ आलं आणि नावेत पाणी शिरू लागलं आणि ती बुडू लागली.+ २४ म्हणून त्यांनी जाऊन त्याला उठवलं आणि ते त्याला म्हणाले: “गुरू, गुरू, आपण बुडतोय!” तेव्हा तो उठला आणि त्याने वाऱ्याला आणि उसळणाऱ्या लाटांना दटावलं. मग वादळ थांबलं आणि सगळं काही शांत झालं.+ २५ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुमचा विश्वास कुठे आहे?” पण ते घाबरले होते आणि थक्क होऊन एकमेकांना म्हणू लागले: “हा आहे तरी कोण? हा तर वाऱ्याला आणि पाण्यालाही हुकूम देतो आणि तेही त्याचं ऐकतात.”+
-