२० तो त्यांना म्हणाला: “तुमचा विश्वास कमी असल्यामुळे. कारण मी तुम्हाला खरं सांगतो, की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याइतकाही विश्वास असला, तर तुम्ही या डोंगराला ‘इथून तिथे जा’ असं म्हणाल आणि तो जाईल. आणि कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नसेल.”+
२३ मी तुम्हाला खरं सांगतो, की जर कोणी या डोंगराला म्हणाला, की ‘इथून उपटून समुद्रात जाऊन पड,’ आणि जर त्याने मनात कोणतीही शंका न धरता, आपल्या बोलण्याप्रमाणे नक्की होईल असा विश्वास बाळगला, तर त्याच्यासाठी ते खरोखरच घडेल.+
६ तेव्हा प्रभू म्हणाला: “जर तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याइतका विश्वास असला, तर तुम्ही या झाडाला* ‘इथून उपटून समुद्रात लावलं जा’ असं म्हणाल आणि ते तुमचं ऐकेल.+
९ पौल बोलत असताना हा माणूस ऐकत होता. तेव्हा पौलने त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं, की त्या माणसाला आपण बरं होऊ असा विश्वास आहे.+१० म्हणून तो त्याला मोठ्याने म्हणाला: “आपल्या पायांवर उभा राहा.” तेव्हा तो माणूस लगेच उठून उभा राहिला आणि चालू लागला.+