-
लूक २१:२९-३३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२९ मग त्याने त्यांना एक उदाहरण सांगितलं: “अंजिराचं झाड आणि इतर सगळी झाडं पाहा.+ ३० त्यांना पालवी फुटते, तेव्हा तुम्ही ओळखता की आता उन्हाळा जवळ आलाय. ३१ त्याच प्रकारे, जेव्हा तुम्ही या गोष्टी घडताना पाहाल, तेव्हा देवाचं राज्य जवळ आलंय हे ओळखा. ३२ मी तुम्हाला खरं सांगतो, सगळ्या गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी मुळीच नाहीशी होणार नाही.+ ३३ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत.+
-