-
मत्तय २६:५५, ५६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५५ मग येशू लोकांच्या जमावाला म्हणाला: “मी काय चोर आहे, की तुम्ही मला तलवारी आणि काठ्या घेऊन पकडायला आलात? दररोज मी मंदिरात बसून शिकवत होतो,+ तेव्हा तुम्ही मला पकडलं नाही.+ ५६ पण, संदेष्ट्यांनी जे लिहिलंय* ते पूर्ण व्हावं म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत.”+ तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.+
-
-
लूक २२:५२, ५३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५२ मग आपल्याला पकडण्यासाठी आलेल्या मुख्य याजकांना, मंदिराच्या अधिकाऱ्यांना आणि वडीलजनांना येशू म्हणाला: “एखाद्या चोराला पकडावं तसं तुम्ही तलवारी आणि काठ्या घेऊन मला पकडायला आला आहात का?+ ५३ दररोज मी तुमच्यासोबत मंदिरात होतो,+ तेव्हा तुम्ही मला पकडलं नाही.+ पण, ही तुमची आणि अंधाराची राज्य करायची वेळ आहे.”+
-