-
मत्तय १३:३-९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ मग त्याने उदाहरणं देऊन+ त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला: “एकदा एक शेतकरी पेरणी करायला निघाला.+ ४ तो पेरणी करत होता, तेव्हा काही बी रस्त्याच्या कडेला पडलं आणि पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकलं.+ ५ काही बी खडकाळ जमिनीवर पडलं. तिथे जास्त माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवलं.+ ६ पण सूर्य वर येताच कडक उन्हामुळे रोपं वाळून गेली, कारण त्यांनी मूळ धरलं नव्हतं. ७ काही बी काटेरी झुडपांत पडलं आणि ती झुडपं वाढल्यावर त्यांनी रोपांची वाढ खुंटवली.+ ८ पण काही बी चांगल्या जमिनीवर पडलं आणि कुठे शंभरपट, कुठे साठपट, तर कुठे तीसपट असं पीक येऊ लागलं.+ ९ ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.”+
-
-
लूक ८:५-८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ “एक शेतकरी बी पेरायला निघाला. तो पेरणी करत असताना, काही बी रस्त्याच्या कडेला पडलं आणि तुडवलं गेलं आणि आकाशातल्या पक्ष्यांनी ते खाऊन टाकलं.+ ६ तर काही बी खडकाळ जमिनीवर पडून त्यांना अंकुर फुटले. पण ओलावा नसल्यामुळे ते बी वाळून गेलं.+ ७ आणखी काही बी काटेरी झुडपांत पडलं आणि त्यांच्यासोबत वाढणाऱ्या या काटेरी झुडपांनी रोपांची वाढ खुंटवली.+ ८ पण, काही बी चांगल्या जमिनीवर पडलं आणि अंकुर फुटल्यावर त्यांनी शंभरपट फळ दिलं.”+ या गोष्टी सांगितल्यावर तो मोठ्याने म्हणाला: “ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं.”+
-