३ त्याने तुम्हाला नम्र केलं आणि तुम्हाला उपाशी राहू दिलं;+ तुम्हाला किंवा तुमच्या वाडवडिलांनाही माहीत नसलेला मान्ना त्याने तुम्हाला खायला दिला.+ माणूस फक्त भाकरीने नाही, तर यहोवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक वचनामुळे जगतो,+ याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी त्याने असं केलं.