-
मत्तय ११:७-११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ ते तिथून जात होते, तेव्हा येशू जमलेल्या लोकांशी योहानबद्दल बोलू लागला: “ओसाड रानात तुम्ही काय पाहायला गेला होता?+ वाऱ्याने हलणारी गवताची काडी?+ ८ मग काय पाहायला गेला होता? मऊ मखमली कपडे* घातलेला माणूस? असे कपडे घालणारे तर राजमहालात असतात. ९ मग, कशाला गेला होता तुम्ही? संदेष्ट्याला पाहायला? हो, मी तुम्हाला सांगतो, जो संदेष्ट्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे त्याला.+ १० हा तोच आहे ज्याच्याबद्दल असं लिहिलंय: ‘पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे* पाठवतोय. तो तुझ्यापुढे जाऊन तुझ्यासाठी मार्ग तयार करेल.’+ ११ मी तुम्हाला खरं सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा देणारा योहान याच्यापेक्षा श्रेष्ठ, अजूनपर्यंत कोणी आलेला नाही. पण स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.+
-