२३ त्याच वेळी, दुष्ट स्वर्गदूताच्या प्रभावाखाली असलेला एक माणूस त्यांच्या सभास्थानात होता. तो ओरडून म्हणाला: २४ “हे नासरेथच्या येशू, आमचं तुझ्याशी काय घेणंदेणं?+ तू काय आमचा नाश करायला आला आहेस? तू कोण आहेस हे मला चांगलं माहीत आहे. तू देवाचा पवित्र सेवक आहेस!”+