५ तो बोलतच होता, तितक्यात एका तेजस्वी ढगाने त्यांना झाकून टाकलं आणि त्या ढगातून असा आवाज ऐकू आला: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय.+ तुम्ही त्याचं ऐका.”+
२२ मोशेनेही स्वतः असं म्हटलं होतं: ‘तुमचा देव यहोवा* तुमच्या भावांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुमच्यासाठी उभा करेल.+ तो जे काही सांगेल ते तुम्ही ऐका.+२३ खरंतर जो कोणी* त्या संदेष्ट्याचं ऐकणार नाही त्याचा आपल्या लोकांतून पूर्णपणे नाश केला जाईल.’+