-
मत्तय २१:१-३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ यरुशलेमजवळ आल्यावर ते जैतुनांच्या डोंगरावर असलेल्या बेथफगे इथे पोहोचले. तेव्हा येशूने दोन शिष्यांना असं सांगून पुढे पाठवलं:+ २ “समोरच्या गावात जा; तिथे गेल्यावर तुम्हाला एक गाढवी आणि तिचं पिल्लू बांधलेलं दिसेल. त्यांना सोडवून माझ्याकडे आणा. ३ जर कोणी काही म्हणालं, तर ‘प्रभूला यांची गरज आहे’ असं सांगा, म्हणजे तो लगेच त्यांना जाऊ देईल.”
-
-
मार्क ११:१-६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
११ यरुशलेमजवळ आल्यावर ते जैतुनांच्या डोंगरावर असलेल्या बेथफगे आणि बेथानी+ इथे पोहोचले. तेव्हा येशूने दोन शिष्यांना पुढे पाठवलं+ २ आणि त्यांना सांगितलं: “समोरच्या गावात जा आणि तिथे जाताच तुम्हाला गाढवाचं एक पिल्लू बांधलेलं दिसेल. त्याच्यावर आतापर्यंत कोणीही बसलेलं नाही. त्याला सोडवून इकडे आणा. ३ जर कोणी तुम्हाला म्हटलं, की ‘त्याला का सोडता?’ तर म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवेल.’” ४ तेव्हा ते गेले आणि त्यांना रस्त्याच्या कडेला एका दाराजवळ गाढवाचं पिल्लू बांधलेलं दिसलं. त्यांनी त्याला सोडलं.+ ५ पण तिथे उभे असलेले काही लोक त्यांना म्हणाले: “तुम्ही गाढवाच्या पिल्लाला का सोडताय?” ६ त्यांनी येशूने सांगितल्याप्रमाणेच उत्तर दिलं, तेव्हा त्या लोकांनी त्यांना जाऊ दिलं.
-