२७ येशू असंही म्हणाला, “माझ्या पित्याने सर्व गोष्टी माझ्या स्वाधीन केल्या आहेत+ आणि पित्याशिवाय कोणीही मुलाला पूर्णपणे ओळखत नाही.+ तसंच, पित्यालाही कोणी पूर्णपणे ओळखत नाही, फक्त मुलगा त्याला ओळखतो. आणि ज्या कोणाला तो पित्याबद्दलचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, तोच पित्याला ओळखतो.+