वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ११८:२५, २६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  २५ हे यहोवा, आम्ही याचना करतो, कृपा करून आम्हाला वाचव!

      हे यहोवा, कृपा करून आम्हाला विजयी कर!

       २६ यहोवाच्या नावाने येणारा आशीर्वादित असो;+

      आम्ही यहोवाच्या घरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.

  • मत्तय २१:८, ९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ जमलेल्या लोकांपैकी बहुतेकांनी आपली बाहेरची वस्त्रं रस्त्यावर पसरली.+ तर, इतरांनी झाडांच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावर पसरल्या. ९ आणि त्याच्या पुढे आणि मागे चालणारे लोक अशी घोषणा करत होते: “आम्ही प्रार्थना करतो, दावीदच्या मुलाचा उद्धार होवो!+ यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो!+ स्वर्गात राहणाऱ्‍या देवा, आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो!”+

  • मार्क ११:८, ९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ बऱ्‍याच जणांनी रस्त्यावरही आपली बाहेरची वस्त्रं पसरली. तर, इतरांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावर पसरल्या.+ ९ तेव्हा पुढे जाणारे आणि मागून येणारे लोक अशी घोषणा करत होते: “आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो!+ यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो!+

  • योहान १:४९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४९ तेव्हा नथनेल त्याला म्हणाला: “रब्बी, तू देवाचा मुलगा, इस्राएलचा राजा आहेस!”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा