-
प्रेषितांची कार्यं २६:१७, १८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ मी या लोकांकडे आणि इतर राष्ट्रांकडे तुला पाठवतोय; मी त्यांच्यापासून तुझं रक्षण करीन.+ १८ तू त्यांचे डोळे उघडावेत,+ त्यांना अंधारापासून+ प्रकाशाकडे+ आणि सैतानाच्या अधिकारापासून+ देवाकडे वळायला लावावं, म्हणून मी तुला त्यांच्याकडे पाठवतोय. यामुळे त्यांना पापांची क्षमा मिळेल+ आणि माझ्यावरच्या विश्वासाने पवित्र झालेल्यांमध्ये वारसाही मिळेल.’
-
-
२ करिंथकर ४:३, ४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ जर आम्ही घोषित करत असलेला आनंदाचा संदेश खरंच पडद्याने झाकलेला असेल, तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी तो झाकलेला आहे. ४ विश्वास न ठेवणाऱ्या या लोकांची मनं या जगाच्या व्यवस्थेच्या* देवाने+ आंधळी केली आहेत.+ हे यासाठी, की ख्रिस्त जो देवाचं प्रतिरूप आहे,+ त्याच्याबद्दलच्या गौरवी संदेशाचा प्रकाश त्यांच्यावर चमकू नये.+
-
-
इफिसकर २:१, २पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ शिवाय, तुम्ही आपल्या अपराधांमुळे आणि पापांमुळे मेलेले असे होता, तरीसुद्धा देवाने तुम्हाला जिवंत केलं.+ २ तुम्ही आपल्या पापांत एकेकाळी या जगाच्या व्यवस्थेप्रमाणे* चालत होता+ आणि जगाच्या मनोवृत्तीवर+ नियंत्रण करणाऱ्याला शासक मानून चालत होता. ही मनोवृत्ती हवेप्रमाणे सगळीकडे पसरलेली असून,+ ती आज्ञा न मानणाऱ्यांमध्ये आज कार्य करत आहे.
-