-
प्रेषितांची कार्यं १७:६, ७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ पण त्यांना ते सापडले नाहीत, तेव्हा त्यांनी यासोनला आणि काही बांधवांना फरफटत शहराच्या अधिकाऱ्यांपुढे आणलं. ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले: “ज्या माणसांनी सगळ्या जगात उलथापालथ केली* आहे, ते आता इथेही पोहोचले आहेत!+ ७ आणि यासोनने त्यांना आपल्या घरात पाहुणे म्हणून ठेवलंय. ही सगळी माणसं, येशू नावाचा दुसराच कोणी राजा आहे असं म्हणून कैसराच्या* हुकमांच्या विरोधात वागत आहेत.”+
-