वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद २१:२२, २३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ जर एखाद्या माणसाने मृत्युदंडाची शिक्षा असलेलं पाप केल्यामुळे, त्याला ठार मारण्यात आलं असेल+ आणि तुम्ही त्याला वधस्तंभावर* लटकवलं असेल,+ २३ तर त्याचा मृतदेह रात्रभर वधस्तंभावर राहू देऊ नका.+ त्याऐवजी तुम्ही त्याच दिवशी त्याला पुरा, कारण ज्याला वधस्तंभावर लटकवण्यात आलं आहे, तो देवाकडून शापित आहे.+ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला जो देश वारसा म्हणून दिला आहे, तो तुम्ही दूषित करू नका.+

  • मत्तय २७:५७-६०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५७ मग दुपार टळून गेल्यावर, अरिमथाई इथला योसेफ नावाचा एक श्रीमंत माणूस आला. तोही येशूचा शिष्य झाला होता.+ ५८ या माणसाने पिलातकडे जाऊन येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी विनंती केली.+ तेव्हा पिलातने तो त्याला देण्याची आज्ञा केली.+ ५९ योसेफने त्याचा मृतदेह नेऊन तो उत्तम प्रतीच्या, स्वच्छ मलमलीच्या कापडात गुंडाळला,+ ६० आणि त्याने खडकात खोदलेल्या त्याच्या नव्या कबरेत* तो ठेवला.+ मग त्याने एक मोठा दगड लोटून कबरेचं* दार बंद केलं आणि तो निघून गेला.

  • मार्क १५:४३-४६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४३ तेव्हा, अरिमथाई इथला योसेफ तिथे आला. तो न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता आणि तोसुद्धा देवाच्या राज्याची वाट पाहत होता. तो हिंमत करून पिलातकडे गेला आणि त्याने येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी त्याला विनंती केली.+ ४४ पण येशू इतक्यात कसा काय मेला याचं पिलातला आश्‍चर्य वाटलं. म्हणून त्याने सैन्याच्या अधिकाऱ्‍याला बोलावून येशू खरोखरच मेला का, असं त्याला विचारलं. ४५ मग सैन्याच्या अधिकाऱ्‍याकडून खातरी करून घेतल्यावर त्याने येशूचा मृतदेह योसेफला दिला. ४६ योसेफने उत्तम प्रतीचं मलमलीचं कापड विकत आणलं आणि येशूचं शरीर खाली उतरवून ते त्या कापडात गुंडाळलं. मग त्याने ते खडकात खोदलेल्या एका कबरेत* ठेवलं+ आणि मोठा दगड लोटून कबरेचं दार बंद केलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा