-
लूक २:२९-३२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२९ “हे सर्वोच्च प्रभू, आता तुझा दास शांतीने मरू शकतो.+ कारण तू सांगितल्याप्रमाणे, ३० ज्याच्याद्वारे तू तारण करणार आहेस त्याला मी पाहिलंय.+ ३१ सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांनी त्याला पाहावं म्हणून तू त्याला पाठवलं आहेस.+ ३२ तो राष्ट्रांच्या डोळ्यांवरचा पडदा दूर करणारा+ प्रकाश+ आणि तुझे लोक इस्राएल यांचा गौरव आहे.”
-
-
प्रेषितांची कार्यं १८:५, ६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ मग सीला+ आणि तीमथ्य+ हे दोघं मासेदोनियाहून आले. तेव्हा पौलने प्रचारकार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं. यहुद्यांना साक्ष देऊन येशू हाच ख्रिस्त आहे, याची तो त्यांना खातरी पटवून देऊ लागला.+ ६ पण ते त्याचा विरोध करत राहिले आणि त्याच्याबद्दल बरंवाईट बोलत राहिले. तेव्हा, आपले कपडे झटकून+ तो त्यांना म्हणाला: “तुमच्या रक्ताचा दोष तुमच्याच माथी येवो.+ मी निर्दोष आहे.+ आतापासून मी विदेशी लोकांकडे जाईन.”+
-