२१ तुमचा खटला पुढे आणा, तुमची बाजू मांडा.
एकत्र येऊन सल्लामसलत करा.
पूर्वीपासून हे कोणी सांगितलं?
आणि प्राचीन काळापासून हे कोणी जाहीर केलं?
मी यहोवानेच हे केलं नाही का?
माझ्याशिवाय दुसरा कोणी देव नाही;
माझ्याशिवाय दुसरा कोणी नीतिमान देव आणि तारणकर्ता नाही.+