वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ३९:७-९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ काही काळाने, योसेफच्या मालकाची बायको त्याच्याकडे आकर्षित झाली आणि ती त्याला म्हणाली: “माझ्याशी संबंध ठेव.” ८ पण त्याने नकार दिला आणि तो म्हणाला: “माझ्या मालकांनी घराचा सर्व कारभार माझ्या ताब्यात दिला आहे. आणि त्यामुळे ते घरातल्या कोणत्याही गोष्टीची चिंता करत नाहीत. ९ या घरात मलाच सर्वात जास्त अधिकार आहे आणि तुम्हाला सोडून बाकी सर्वकाही त्यांनी माझ्या हातात दिलं आहे, कारण तुम्ही त्यांच्या पत्नी आहात. तर मग, इतकं मोठं वाईट काम करून मी देवाविरुद्ध पाप कसं करू?”+

  • १ करिंथकर ६:९, १०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ अनीतिमान माणसं देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत हे तुम्हाला माहीत नाही का?+ फसू नका. अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे,+ मूर्तिपूजक,+ व्यभिचारी,+ पुरुषवेश्‍या,*+ समलैंगिक कृत्यं करणारे पुरुष,*+ १० चोर, लोभी,+ दारुडे,+ शिव्याशाप देणारे आणि इतरांना लुबाडणारे देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.+

  • इफिसकर ५:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ कारण तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे आणि याची पुरेपूर जाणीव आहे, की अनैतिक लैंगिक कृत्यं करणारा,*+ अशुद्ध कामं करणारा किंवा लोभी माणूस+ (जो मूर्तिपूजा करणाऱ्‍यासारखा आहे), यांच्यापैकी कोणालाही ख्रिस्ताच्या आणि देवाच्या राज्यात वारसा मिळणार नाही.+

  • कलस्सैकर ३:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ म्हणून अनैतिक लैंगिक कृत्यं,* अशुद्धपणा, अनावर लैंगिक वासना,+ वाईट इच्छा आणि लोभीपणा (जी एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे), यांसारख्या गोष्टी उत्पन्‍न करणाऱ्‍या पृथ्वीवरच्या आपल्या शरीराच्या अवयवांना मारून टाका.+

  • १ थेस्सलनीकाकर ४:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही पवित्र असावं+ आणि अनैतिक लैंगिक कृत्यांपासून* स्वतःला दूर ठेवावं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा