वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती २४:२, ३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ अब्राहाम आपल्या घरातल्या सर्व गोष्टींवर देखरेख करणाऱ्‍या सगळ्यात जुन्या सेवकाला+ म्हणाला: “कृपा करून, तुझा हात माझ्या मांडीखाली ठेव ३ आणि आकाश व पृथ्वीचा देव यहोवा याची शपथ घे, की ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींमधून तू माझ्या मुलासाठी बायको शोधणार नाहीस.+

  • अनुवाद ७:३, ४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ तुम्ही त्यांच्याशी लग्नाचे संबंध जोडू नका.* तुमच्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नका किंवा आपल्या मुलांसाठी त्यांच्या मुली करू नका.+ ४ कारण त्या तुमच्या मुलांना माझी उपासना सोडून इतर देवांच्या मागे जायला लावतील;+ यामुळे यहोवाचा क्रोध तुमच्यावर भडकेल आणि तो लगेच तुमचा सर्वनाश करेल.+

  • नहेम्या १३:२५, २६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ म्हणून मी त्यांना खडसावलं आणि सक्‍त ताकीद दिली. मी त्यांच्यापैकी काही माणसांना मार दिला+ आणि त्यांचे केस उपटले. मी त्यांना देवाच्या नावाने अशी शपथ घ्यायला लावली, की आम्ही आपल्या मुली त्यांच्या मुलांना देणार नाही आणि त्यांच्या मुली आमच्यासाठी किंवा आमच्या मुलांसाठी करणार नाही.+ २६ मग मी त्यांना म्हणालो, “इस्राएलच्या शलमोन राजाला अशा स्त्रियांनीच पाप करायला लावलं नव्हतं का? सगळ्या राष्ट्रांमध्ये त्याच्यासारखा राजा शोधून सापडला नसता.+ देवाचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं,+ त्यामुळे त्याने संपूर्ण इस्राएलचं राज्य त्याच्या हाती दिलं होतं. पण, त्याच्या विदेशी बायकांनी त्यालाही पाप करायला लावलं.+

  • २ करिंथकर ६:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ विश्‍वासात नसलेल्यांसोबत जोडले जाऊ नका.*+ कारण नीती आणि अनीतीचा काय संबंध?+ किंवा उजेड आणि अंधार यांच्यात काय मेळ?+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा