-
लेवीय ६:१४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१४ हा अन्नार्पणाचा नियम आहे:+ अहरोनच्या मुलांनी वेदीपुढे ते यहोवासाठी अर्पण करावं.
-
-
गणना १८:३०, ३१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३० लेव्यांना असं सांग, ‘जेव्हा तुम्ही त्या भेटींमधल्या सर्वात चांगल्या गोष्टी दान म्हणून द्याल, तेव्हा जे उरेल ते तुमच्यासाठी असेल. ते तुमच्यासाठी तुमच्या खळ्यातल्या* धान्यासारखं आणि तुमच्या उत्पन्नातल्या द्राक्षारसासारखं किंवा तेलासारखं असेल. ३१ तुम्ही आणि तुमच्या घराण्यातले लोक तो उरलेला भाग कोणत्याही ठिकाणी खाऊ शकता, कारण भेटमंडपातल्या सेवेबद्दल तुमचा मोबदला म्हणून तो तुम्हाला देण्यात आला आहे.+
-
-
अनुवाद १८:१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ लेवीय याजकांना, खरंतर लेवी वंशातल्या कोणालाही इस्राएली लोकांसोबत जमिनीचा वाटा किंवा वारसा दिला जाणार नाही. यहोवासाठी आगीत जाळून केलेली अर्पणं, जी त्याचा वारसा आहेत, त्यांतलं मांस ते खातील.+
-