२४ “अभिमान बाळगायचाच असेल,
तर त्याला माझ्याविषयी सखोल समज आणि ज्ञान आहे याचा अभिमान बाळगावा.+
मी यहोवा आहे आणि मी एकनिष्ठ प्रेम करणारा, पृथ्वीवर न्याय आणि नीती प्रस्थापित करणारा देव आहे,+ याचा अभिमान बाळगावा.
कारण याच गोष्टींमुळे मला आनंद होतो,”+ असं यहोवा म्हणतो.