६ पण एका ठिकाणी एका साक्षीदाराने असं म्हटलं आहे: “माणूस काय आहे की तू त्याला आठवणीत ठेवावं? आणि मानव काय आहे की तू त्याची काळजी घ्यावी?+ ७ तू त्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी बनवलंस; तू त्याला गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट घातलास आणि तुझ्या हातांच्या कार्यांवर त्याला नेमलंस.