२९ पण लोट सदोममधून बाहेर गेला त्या दिवशी आकाशातून आगीचा आणि गंधकाचा वर्षाव झाला आणि त्या सगळ्यांचा नाश झाला.+३० मनुष्याचा मुलगा प्रकट होण्याच्या दिवशीही असंच घडेल.+
७ सध्या तुम्हाला संकटं सोसावी लागत असली, तरी जेव्हा प्रभू येशू स्वर्गातून आपल्या शक्तिशाली स्वर्गदूतांसोबत+ अग्नीच्या ज्वालेत प्रकट होईल,+ तेव्हा आमच्यासोबत तुम्हालाही सुटका मिळेल.
७ हे यासाठी, की येशू ख्रिस्त प्रकट होण्याच्या वेळी+ तुमच्या पारखलेल्या विश्वासामुळे+ तुम्हाला प्रशंसा, गौरव आणि सन्मान मिळावा. तुमचा हा विश्वास आगीत परीक्षा झाल्यावरही* नष्ट होणाऱ्या सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे.