२५ तू नियमशास्त्राचं पालन करत असशील,+ तरच तुझ्या सुंतेचा*+ काही उपयोग आहे. पण जर तू नियमशास्त्रातल्या आज्ञा मोडत असशील, तर तुझी सुंता न झाल्यासारखीच आहे.
१० जे नियमशास्त्रातल्या कार्यांवर अवलंबून राहतात ते सगळे शापित आहेत. कारण असं लिहिलं आहे: “जो कोणी नियमशास्त्राच्या गुंडाळीत लिहिलेल्या या सर्व गोष्टी करण्यात टिकून राहत नाही, तो शापित असो.”+