५ म्हणून अनैतिक लैंगिक कृत्यं,* अशुद्धपणा, अनावर लैंगिक वासना,+ वाईट इच्छा आणि लोभीपणा (जी एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे), यांसारख्या गोष्टी उत्पन्न करणाऱ्या पृथ्वीवरच्या आपल्या शरीराच्या अवयवांना मारून टाका.+
२० तरीपण मी या गोष्टीसाठी तुला दोषी ठरवतो, की ईजबेल नावाच्या त्या स्त्रीला तू खपवून घेतोस.+ ती स्वतःला संदेष्टी म्हणवते आणि माझ्या सेवकांना बहकवून त्यांना अनैतिक लैंगिक कृत्यं* करायला+ आणि मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टी खायला शिकवते.