-
रोमकर ४:१६, १७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ अब्राहामला त्याच्या विश्वासामुळे ते वचन देण्यात आलं आणि यातून देवाची अपार कृपाही प्रकट झाली.+ त्यामुळे, त्याच्या सर्व संततीला,* ते वचन मिळेल हे निश्चित होतं;+ फक्त ज्यांनी नियमशास्त्राचं पालन केलं त्यांनाच नाही, तर अब्राहामसारखा ज्यांचा विश्वास आहे त्यांनाही. तो तर आपल्या सगळ्यांचा पिता आहे.+ १७ (शास्त्रात लिहिल्याप्रमाणेच हे आहे: “मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता म्हणून नेमलं आहे.”)+ ज्या देवावर त्याचा विश्वास होता, जो मेलेल्यांना जिवंत करतो आणि ज्या अजून घडल्या नाहीत अशा गोष्टींबद्दल त्या घडल्याप्रमाणे* बोलतो, त्या देवासमोर हे झालं.
-