-
२ तीमथ्य २:२४, २५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ प्रभूच्या दासाला भांडण करायची गरज नाही, तर तो सगळ्यांशी सौम्यतेने* वागणारा,+ शिकवण्याची योग्यता असलेला, तसंच इतरांनी त्याचं वाईट केलं, तरी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असावा.+ २५ याशिवाय, ज्यांची योग्य मनोवृत्ती नाही अशांना त्याने सौम्यतेने शिकवावं.+ म्हणजे कदाचित देव त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळवण्यासाठी पश्चात्ताप* करायची संधी देईल.+
-