६ बलिदानं आणि अर्पणं तुला नको होती,+
पण तू माझे कान ऐकण्यासाठी उघडलेस.+
तू होमार्पणं आणि पापार्पणं मागितली नाहीस.+
७ तेव्हा मी म्हणालो: “पाहा! मी आलोय.
गुंडाळीत माझ्याविषयी लिहिण्यात आलंय.+
८ हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करायला मला आनंद वाटतो+
आणि तुझं नियमशास्त्र माझ्या हृदयावर लिहिलेलं आहे.+