९ शेवटी, ते खऱ्या देवाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. अब्राहामने तिथे एक वेदी बांधून त्यावर लाकडं ठेवली. त्यानंतर त्याने आपला मुलगा इसहाक याचे हातपाय बांधून त्याला वेदीवरच्या लाकडांवर ठेवलं.+१० मग अब्राहामने आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा उचलला,+
१६ देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला.+ कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्वास ठेवतो* त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.+