वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते १४:५, ६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ मग शमशोन आपल्या आईवडिलांसोबत तिम्ना इथे गेला. तो जेव्हा तिम्नाच्या द्राक्षमळ्यांजवळ पोहोचला, तेव्हा अचानक एक सिंह गर्जना करत त्याच्या अंगावर आला. ६ त्याच वेळी, यहोवाची पवित्र शक्‍ती* शमशोनवर जोरदारपणे कार्य करू लागली.+ आणि एखाद्या बकरीच्या पिल्लाला फाडून टाकावं, तसं त्याने आपल्या हातांनी त्या सिंहाला फाडून त्याचे दोन तुकडे केले. पण त्याबद्दल त्याने आपल्या आईवडिलांना काहीच सांगितलं नाही.

  • १ शमुवेल १७:३४-३६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ त्यावर दावीद शौलला म्हणाला: “तुमचा हा सेवक आपल्या वडिलांची मेंढरं चारायचा, तेव्हा एकदा एक सिंह+ कळपातलं मेंढरू घेऊन गेला; आणि आणखी एकदा एक अस्वल कळपातलं मेंढरू घेऊन गेलं. ३५ तेव्हा मी त्यांच्या मागे जाऊन त्यांना मारलं आणि त्यांच्या तोंडातून मेंढरांना सोडवलं. ते माझ्या अंगावर आले तेव्हा मी त्यांचे जबडे* धरले, आणि त्यांना खाली पाडून मारून टाकलं. ३६ तुमच्या या सेवकाने सिंह आणि अस्वल या दोघांनाही ठार मारलं! आणि आता त्या बेसुंती पलिष्ट्याचीसुद्धा त्यांच्यासारखीच गत होईल. कारण त्याने जिवंत देवाच्या+ सैन्याला आव्हान दिलं आहे.”*

  • दानीएल ६:२१, २२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ तेव्हा दानीएल लगेच राजाला म्हणाला: “महाराज, युगानुयुग जिवंत राहा! २२ माझ्या देवाने आपला स्वर्गदूत पाठवून सिंहांची तोंडं बंद केली+ आणि त्यांनी मला काहीच केलं नाही.+ कारण देवासमोर मी निर्दोष ठरलो, आणि महाराज! मी तुमचंही काही वाईट केलेलं नाही.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा