-
निर्गम १७:१-३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ इस्राएलचे सर्व लोक यहोवाच्या आज्ञेप्रमाणे सीनच्या ओसाड रानातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडले+ आणि रफीदीम इथे येऊन त्यांनी तळ दिला.+ पण तिथे लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं.
२ त्यामुळे लोक मोशेबरोबर भांडू लागले+ आणि म्हणाले: “आम्हाला प्यायला पाणी दे!” पण मोशे त्यांना म्हणाला: “माझ्याशी का भांडताय? तुम्ही सारखी यहोवाची परीक्षा का पाहता?”+ ३ पण लोकांना खूप तहान लागली होती. म्हणून ते मोशेविरुद्ध कुरकुर करत म्हणाले:+ “तू आम्हाला, आमच्या मुलाबाळांना आणि आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकण्यासाठी इजिप्तमधून बाहेर का आणलंस?”
-