-
लूक १२:१८-२०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ तेव्हा तो म्हणाला, ‘मी असं करीन:+ माझी धान्याची कोठारं पाडून मी मोठी कोठारं बांधीन आणि तिथे माझं सगळं धान्य आणि मालमत्ता साठवीन. १९ मग मी स्वतःला* म्हणीन: “पुढची बरीच वर्षं पुरतील इतक्या उत्तम गोष्टी तू* साठवल्या आहेत. तेव्हा काळजी करू नकोस, खा, पी आणि मौजमजा कर.”’ २० पण देव त्याला म्हणाला, ‘अरे मूर्खा! आज रात्री तू मरशील.* मग तू साठवलेल्या या सगळ्या गोष्टी कोणाला मिळतील?’+
-