१६ येशू दुसऱ्यांदा त्याला म्हणाला: “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस का?” त्याने उत्तर दिलं: “हो प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहीत आहे.” येशू त्याला म्हणाला: “माझ्या लहान मेढरांची काळजी घे.”+
२८ स्वतःकडे आणि पूर्ण कळपाकडे लक्ष द्या.+ कारण पवित्र शक्तीने तुम्हाला त्यांच्यावर देखरेख करणारे म्हणून नेमलंय.+ देवाने स्वतःच्या मुलाच्या रक्ताने+ विकत घेतलेल्या मंडळीची तुम्ही मेंढपाळांप्रमाणे काळजी घ्यावी,+ म्हणून तुम्हाला नेमण्यात आलंय.